वेंगुर्ला वायंगणी तळेकरवाडी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी…यासाठी तहसिलदार वेंगूर्ला यांना निवेदन देण्‍यात आले

अल निनो वादळाच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू बागायतदार शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तळेकरवाडी महसूल गावातील शेतक-यांना तात्काळ मिळावी, अशी मागणी वायंगणी ( ता. वेंगुर्ला ) ग्रामपंचायत च्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत वायंगणी सरपंच व शेतकऱ्यांनी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

Scroll to Top