
ग्रामपंचायत वायंगणी
परिचय
ग्रामपंचायत वायंगणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये वायंगणी ग्रामपंचायत येते. वायंगणी गावाच्या परिचयासाठी काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे:
- स्थान: वायंगणी हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: वायंगणी ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: वायंगणी ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी वायंगणी, कोंडुरा समुद्रकिनारा आहे.
- कर्मचारी: वायंगणी ग्रामपंचायतीत एकूण ०४ पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत.
वायंगणी गावाची माहिती
वेंगुर्लेपासून सात किमी. अंतरावर घायंगणी हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. वायंगणीचे क्षेत्रफळ १३३२ हेक्टर असुन हे गाव चौकोनाकृती आहे. निसर्ग संपत्तीच्या बाबतीत कोकण किना-यावरील इतर गावांप्रमाणे वायंगणी हे समृद्ध आहे. दक्षिण सीमेला पुर्व-पश्चिम दाभोलीची खाडी वाहते. उत्तरेस केळुस, तेंडोली तर पुर्वेस खानोली आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र अशी रचना आहे.
१०० वर्षापुर्वी हा बहुलेक भारा अरण्यमय होता. ओहोळाच्या दोन्ही अंगाला मोठमोठ्या द-या आहेत. डोगरमाथ्यावर व उतारावर ठीकठीकाणी सुर्यप्रकाशाचाही आत प्रवेश होत नसे. चार मैलाचा पश्चिम किनारा शुभ वाळुचा पट्टा घनदाट झाळीनी व्यापलेला होता. १८ व्या शतकात आदिलशहाच्या कारकिर्दीत कोकण प्रांत त्यांच्या अधिपत्याखाली होता. अरण्यमय व डोंगराळ भाग त्याने एका गौम खानोलकर नावाच्या सरदाराला बहाल केला. येथे पुर्वी जैनांचे सामाज्य होते. गौम सरदाराने श्री देव सिध्देश्वर व श्री रवळनाथ आदी बारा देवदेवतांच्या मुर्ती स्थापन करण्यात मदत केली. बंगालहुन समुद्रमार्गे आलेल्या लोकांची त्याने या गावात वसाहत केली. वेंगुर्ले बंदर ते कोंडुरा या पट्ट्यात त्याने गाव वसविला. किना-यालगतच्या माणसांना मासेमारीचा उदयोग मिळाला, परंतु इतरांचे काय, हा प्रश्न होता. म्हणुनच डोंगराळ व राने तोडुन तेथे सपाट जमीन करून शेतीस सुरुवात केली. (सध्या तेथे नारळ फोफळीचा पट्टा आहे.) पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने समुद्राचे पाणीही आत शिरु लागले. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ लागले. त्यानंतर गौम खानोलकरने उन्हाळी शेतीस प्रारंभ केला. या ऊन्हाळी शेतीला वायंगण असे म्हटले जाते. वायंगण जेथे होते तो भाग म्हणजेच वायंगणी असे म्हटले जाऊ लागले. जो नारळ फोफळीचा पट्टा आहे तो प्रथम मैदानी प्रदेश होता. २०० ते ३०० वर्षापर्यंत ही शेती मोठ्या प्रमाणावर केली गेली. नंतर खारे पाणी भरुन येथील जमीन नापीक बनली व इतरही लागवडीस अयोग्य असल्याने माड बागायती सुरु केली. या भागाला सरवाळ असेही म्हटले जाते. पुर्वी या गावाला वायंगणवाडी म्हटले जाई.
२००२ साली या गावाचे स्वतंत्र अस्तित्व झाले. खानोलीमध्ये या गावाची सर्व देवस्थाने राहीली. खानोलीतील दैवत पुर्वी वायंगणी धौडवाडी येथील देवाच्या तळीवर होती. ही साक्ष देणारी ही देवाची तळी अजुनही सुस्थितीत आहे. या गावातील गवानी देवी व बाराचा पुर्वस हे जागृत देवस्थान मानले जाते. हरिचरणगिरी मठ पुरातन वास्तु असुन दक्षिण कोकणातील सर्वात प्राचीन मठ म्हणुन ओळखला जातो. श्रीमत हरिचरणगिरी महाराजांची संजिवन समाधी सुमारे ६०० वर्षापुर्वीची आहे. हरिचरण नावाच्या निवती गावातील एका मुलाने घरातुन परागंदा होऊन गिरी संप्रदायाची दिक्षा घेतली व येथे येऊन (मायभुमीत) संजिवन समाधी घेतली. म्हणुन त्या भागाचे नावही हरिचरणगिरी असे आहे. जनावरांच्या अनेक गुहा ठिकठिकाणी होत्या. त्यापैकी एक गुद्दा पश्चिम किना-यावर आहे. या ठिकाणी डोंगराचा एक सुळका थेट समुद्रात घुसलेला आहे. यालाच कोड-याचा डोंगर असे म्हणतात. डोंगराचा तुटका कड़ा उंच व गर्द झाडीने आच्छपदीत असुन त्याच्या पायथ्याशी उंच गुहा आहे, वास्तवात ते एक भुयाराचे तोड आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर आठ दिवस समुद्राच्या तुफानी लाटा या भुयाराच्या तोंडावर प्रचंड वेगाने आदळतात. त्यांचा तोफेसारखा होणारा आवाज आसमंतात दुरवर ऐकू येतो. या आवाजाला कोंडुरो गराजता-पावस इलो असे शब्द कानावर पडु लागतात. त्यानंतर पावसाअगोदरच्या कामासाठी येथील लोकांची तारांबळ उडते. वर्षाऋतुच्या आगमनाची चाहुल हा कोंडुरा देतो.
कोंडु-याचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील लिंगेश्वर देवस्थान, हे रमणीय स्थळ मोहयुन टाकणारे आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या कडेलाच नवससाला पावणा-या गणपतीचे मंदीर आहे. जरा पुढे दोन कि.मी. अंतरावर दादा पंडीत यांनी श्री गजानन, विठ्ठल रखुमाई, दत्त, हनुमान, साईबाबा मंदीरे उभारली आहेत. वायंगणी गावात सर्वत्र डोंगर रांगा असल्याने हा खडकाळ प्रदेश आहे. डोंगरात जागा मिळेल तेथे घरे बांधली गेली. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु वायंगणी गावचा अभिमान. खानोलकरांचे वायंगणी कोंडुरा हे जन्मगाव आहे. त्यांनी आपल्या कोंडुरा या कादंबरीतून या गावाचा इतिहास साकारला.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत वायंगणी
स्थापना : सन २००२
ग्रामपंचायत वायंगणी
वायंगणी ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.
संपर्क
ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी
गाव : वायंगणी
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क : ०२३६६ २६५५०२
ई-मेल : wayangani07@gmail.com
