ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी मधुन शाळा अंगणवाडी उपकेंद्र यांना विविध साहीत्‍याचे वाटप करण्‍यात आले

 

सोमवार, दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी यांच्या वतीने गावातील ४ शाळा, ४ अंगणवाडी तसेच आरोग्य उपकेंद्र यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये शाळांसाठी लेझीम, डस्टबीन सेट, डोअर मॅट, ढोल, ताशा, कच्छी, अंगणवाडींसाठी धान्यकोटी, डस्टबीन सेट, डोअर मॅट आणि आरोग्य उपकेंद्रासाठी मॉप, डोअर मॅट, फ्लोअर क्लिनर, टॉयलेट ब्रश या साहित्याचा समावेश आहे. सदरचे वाटप सरपंच श्री. दत्ताराम दुतोंडकर, उपसरपंच श्री. अनंत केळजी, ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश मुणनकर, सौ. विद्या कांबळी, सौ. सविता परब, सौ. विद्या गोवेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मधुकर नवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), पोलीस पाटील वायंगणी, आशा स्वयंसेविका ग्रामपंचात कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top